स्वतःचे फेसबुक पेज कसे तयार करावे. || How to create Facebook page.


 नमस्कार मित्रांनो, आज आपण फेसबुक पेज कसे तयार करावे हे जाणून घेणार आहोत. त्याआधी फेसबुक पेज म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय आहे हे माहिती करून घेऊ. तर फेसबुक पेज हे एक फेसबुकमधील सुविधा आहे यामुळे आपण आपल्या अनेक चाहत्यांपर्यंत पोहचू शकतो. आपल्याकडे असणारे माहिती, फोटो, व्हिडीओ असे पोस्ट करून त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतो. फेसबुक हे एक जगातील एकमेव असे प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे आपण अनेक लोकांपर्यंत पोहचू शकतो. तसेच आपल्याकडे असणारे फेसबुक अकाउंट याची क्षमता फक्त 5000 पर्यंत मित्र जोडू शकतो. पण फेसबुकमधील पेज हे एक असे साधन आहे ज्याच्यामुळे आपण कोट्यवधी लोकांपर्यंत आपल्या भावना/माहिती शेअर करू शकतो.


स्वतःचे फेसबुक पेज कसे तयार करावे. || How to create Facebook page.


Facebook page तयार करण्यासाठी आपल्याला मोबाईलमधील फेसबुकचे अँप open करा.


◆ अँप open केल्यानंतर त्यातील खालील स्क्रिनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या page च्या आयकनला क्लिक करा. 



◆ नंतर create या बटनावर क्लिक करा.



◆ खाली दिलेल्या get started या बटनावर क्लिक करा.



◆ तुम्हांला ज्या नावाने फेसबुक पेज तयार करण्याचे आहे ते नाव समाविष्ट करा.



◆ त्यानंतर category  या बटनावर क्लिक करून आपला पेज कोणत्या category मध्ये मोडतो ते समाविष्ट करा.



◆ तुमच्याकडे जर एखादे website असेल तर त्याची लिंक बॉक्समध्ये टाइप करा. किंवा नसेल तर खाली दिलेल्या I don't have a website ला क्लिक करा.



◆ यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या पेजचा profile फोटो व background फोटो सेट करा. आणि खाली दिलेल्या DONE  या बटनावर क्लिक करा. 

 



अशारितीने तुमचे फेसबुक पेज तयार होते आणि आपल्या जे काही पोस्ट करायचे असतील ते पोस्ट करू शकतो. आणि दिलेल्या सूचनेनुसार त्यात पुढील setting करता येते. 



तर आता अशारितीने page तयार करून तुम्ही आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचू शकता.